गुरूवार, 23 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified गुरूवार, 10 फेब्रुवारी 2022 (21:02 IST)

मालेगावमधील अभ्यासिकेला मुस्कान खानचे नाव देणार

मालेगावच्या तत्कालीन आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे  महानगर जिल्हाध्यक्ष आसिफ शेख यांच्या आठ कोटी आमदार निधीतून उभारलेल्या उर्दू घरास शैक्षणिक अभ्यासिकेला मुस्कान खान हिचे नाव देण्यात येणार आहे. याबाबतचा ठराव मालेगाव मनपा महासभेत केला जाणार असल्याची माहिती महापौर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
हिजाबचे जोरदार समर्थन करत हिजाब घालण्याचा विरोध धुडकावून लावणाऱ्या मुस्कान खान मोहम्मद हुसेन खान या विद्यार्थिनीच्या शौर्याचे कौतुक करण्यासाठी या ठरावाची सूचना आपण स्वतः देणार असल्याचे महापौर ताहेरा शेख  यांनी सांगितले. हिजाबच्या समर्थनात मुस्कान हिने जातीयवादी शक्तींना सडेतोड उत्तर दिले आहे. त्यामुळे तिच्या या धाडसाचे कौतुक करण्यासाठी उर्दू घरास तिचे नाव देण्याचा ठराव मनपा महासभेत केला जाणार असल्याची माहिती महापौरांनी दिली.