1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 3 सप्टेंबर 2023 (13:29 IST)

Eknath Khadse : एकनाथ खडसेंच्या लाडूतुलेनंतर गोंधळ

eknath khadse
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांची लाडवाने तुला करण्यात आली असतानाच्या कार्यक्रम लाडू घेण्यासाठी नागरिकांनी गोंधळ घातल्याचे समोर आले आहे. 

एकनाथ खडसे यांचा 2 सप्टेंबर रोजी वाढदिवसाच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असता त्यांची लाडूतुला करण्यात आली. या कार्यक्रमानंतर लाडू खाण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली लाडू मिळवण्यासाठी लोकांनी इथे गोंधळ घातला. पाहता पाहता 2 मिनिटांत सर्व लाडू फस्त झाले. एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने झालेल्या या कार्यक्रमात लाडू मिळवण्यासाठी लहान मुलांपासून मोठ्यांनी जीवाचे रान करून लाडू मिळवले. या कार्यक्रमात झालेल्या गोंधळाची चर्चा सर्वत्र होत आहे. 







Edited by - Priya Dixit