गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 9 ऑगस्ट 2022 (16:00 IST)

Eknath Shinde : लोकसभेतील गटनेतेपदाबाबत शिंदे गटाने निवडणुक आयोगाला दिली कागदपत्रे

eknath shinde
शिवसेनेतील 12 खासदारांनी शिंदे गटात सहभाग नोंदविल्यानंतर शिवसेनेच्यावतीने खासदार संजय राऊत यांनी पक्षाची भूमिका मांडली होती. लोकसभेतील शिवसेना पक्षाच्या गटनेता बदलण्याच्या प्रक्रियेला संजय राऊत यांनी आव्हान दिले होते.आता लोकसभेच्या गटनेता संदर्भातील कागदपत्र शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली आहेत.
 
2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी विनायक राऊत यांची लोकसभेतील पक्षनेतेपदी नियुक्ती केली होती.

संजय राऊत यांची राज्यसभेतील नेतेपदी तसेच दोन्ही सभागृहात सदस्य असलेल्या शिवसेनेच्या संसदीय पक्षनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. खासदार संजय राऊत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन एकनाथ शिंदे गटातील 12 बंडखोर खासदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती.
 
शिंदे गटाने राहुल शेवाळे यांची नेते आणि पाचवेळा खासदार असलेल्या भावना गवळी यांना पक्षाचे प्रतोद घोषित केले होते. राहुल शेवाळे यांना लोकसभेतील शिवसेनेचे नेते म्हणून सभापतींनी मान्यता दिली होती. याबाबतचे कागदपत्र सोमवारी शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला सादर करण्यात आले आहे.