रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 25 नोव्हेंबर 2021 (08:56 IST)

३२ जिल्ह्यांतील एकूण १०५ नगरपंचायतींमध्ये निवडणूक जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यांतील एकूण १०५ नगरपंचायतींमध्ये निवडणूक जाहीर केली आहे. या नगरपंचायतींमध्ये आचारसंहिता देखील लागू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयुक्त यु पी एस मदान यांनी शुक्रवारी राज्यातील नगरपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. 
 
राज्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस.मदान यांनी राज्यातील ३२ जिल्ह्यामध्ये ज्या नगरपंचायतींची एप्रिल २०२० ते मे २०२१ या कालावधीत मुदत संपली आहे अशा ८१ नगरपंचायत आहेत. तसेच डिसेंबर २०२१ मध्ये एकूण १८ नगरपंचायतींची मुदत संपली आहे. तर नवनिर्मित ६ अशा एकूण १०५ नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. प्रत्येकी १७ सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान घेण्यात येईल असे निवडणूक आयुक्त य़ु पी एस मदान यांनी सांगितले आहे.
 
नगरपंचायतींच्या निवडणुकीमध्ये मतदानाची प्रक्रिया २१ डिसेंबर रोजी होणार आहे. तर मतमोजणी २२ डिसेंबर २०२१ रोजी करण्यात येणार आहे. ज्या क्षेत्रांत निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. त्या ठिकाणी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
 
अशी असेल प्रक्रिया
१ ते ७ डिसेंबर २०२१ या कालावधीत नामनिर्देशितपत्रे स्वीकारण्यात येतील. यामध्ये सुट्टीच्या दिवशी स्वीकारण्यात येणार नाही. आलेल्या नामनिर्देशितपत्रांची छाननी आणि पडताळणी ८ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. तर २१ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान सुरु असेल. तसेच २२ डिसेंबरला दुसऱ्याच दिवशी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात येईल आणि विजयी उमेदवाराच्या नावाची घोषणा होईल.
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ठरवलेल्या निकषानुसार आणि उपाययोजनांनुसार निवडणूक घेण्यात यावी. राखीव जागेवर जो उमेदवार निवडणूक लढवणार आहे त्याला नामनिर्देशनप्रमाणपत्रात जात प्रमाणपत्र आणि जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस.मदान यांनी सांगितले आहे.