शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 22 सप्टेंबर 2020 (10:08 IST)

एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना कोरोना

पोलीस विभागातील एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. मागील 2 दिवसांपासून त्यांना सातत्याने ताप येत होता. यानंतर डॉक्टरांनी त्यांना कोरोना चाचणी करण्यास सांगितले होते. दया नायक सध्या एटीएसमध्ये नियुक्त असून एटीएसच्या जुहू युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत.
 
सध्या दया नायक यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांना आलेल्या धमक्यांच्या तपासाचं काम आहे. राज्यातील या बड्या नेत्यांना धमकी आल्याने त्याचा तपास एटीएसतर्फे दया नायक करत आहेत. 
 
दया नायक या धमकी प्रकरणाचा तपास करत असताना सतत आरोपींच्या शोधात बाहेर फिरत होते. ते काही आरोपींच्या संपर्कातही होते. याच काळात त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दया नायक यांना सध्या होम क्वारंटाईन होण्याचा सल्ला देण्यात आला आहे.