1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 डिसेंबर 2021 (21:44 IST)

सीईटीमार्फत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी प्रमाणपत्रे सादर करण्यास मुदतवाढ – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

Extension of time for submission of certificates for centralized admission process through CET - Higher and Technical Education Minister Uday Samant सीईटीमार्फत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी प्रमाणपत्रे सादर करण्यास मुदतवाढ – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतMaharashtra News Regional Marathi News In Webdunia Marathi
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये  केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या प्रथम फेरी उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार जागा वाटप करण्यात आलेली असून केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम दिनांकापर्यंत EWS, NCL आणि CVC/TVC मूळ प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली असल्याची,  माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.
याबाबत विद्यार्थी व पालक यांची मागणी, कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतील आवश्यक असलेल्या संबंधित विविध प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रालयात आयोजित करण्‍यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला उच्च  तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, राज्य सामायिक परीक्षा कक्षाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
श्री.सामंत म्हणाले,  विद्यार्थ्यांच्या हिताकरिता सन 2021-22 करिता प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम  दिनांकापर्यंत EWS/NC/CVC/TVC बाबतची मूळ प्रमाणपत्रे सादर करण्यास मुदतवाढ देण्याच्या निर्णयास मान्यता दिली आहे.