शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जुलै 2022 (21:27 IST)

शेवाळे यांच्या गौप्यस्फोटावर फडणवीस बोलले ........

devendra fadnavis
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 12 बंडखोर खासदारांसोबत दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत खासदार राहुल शेवाळे यांनी गौप्यस्फोट केलेत. भाजपा-शिवसेनेच्या युतीबाबत 2021 मध्येच उद्धव ठाकरे व नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा झाली. मात्र, जुलैमध्ये भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन झाल्यानंतर हा विषय फिस्ककटला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर फडणवीसांनी बोलणं टाळलं आहे.
 
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी आत्ता विभागीय आयुक्त कार्यालयात आहे आणि ही पूरपरिस्थितीची पत्रकार परिषद आहे. त्यामुळे दोन्हींच्या नियमांमध्ये राजकीय प्रश्नांची उत्तरं बसत नाहीत.”