गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 मार्च 2023 (13:14 IST)

विरार रेल्वे स्थानकात रूळ ओलांडताना कुटुंबाचा अपघात

railway track
रेल्वेचे रूळ ओलांडून आपला जीव धोक्यात घालू नका असे रेल्वे प्रशासनाकडून वारंवार बजावले जाते. तरीही काही जण आपला जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडतात आणि जीव गमावून बसतात. विरार रेल्वे स्थानकातून रेल्वेचे रूळ ओलांडताना रेल्वेची धडक लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघातात आई वडिलांसह 3 महिन्यांचा चिमुकला बळी ठरला आहे. मृतकांची ओळख अद्याप पटलेली नाही. 

विरार रेल्वे स्थानकात रेल्वेचे रूळ ओलांडताना पती पत्नी आणि 3 महिन्यांच्या बाळाला वेगात येणाऱ्या मेलची धडक लागून तिघांचा जागीच मृत्यू झाला. रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आहे. मृतकांची ओळख अद्याप पटली नसून त्यांचा शोध घेणं सुरु आहे. 
 
 
Edited By- Priya Dixit