शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017 (17:15 IST)

यवतमाळ : ८ शेतकरी कुटुंबांना २ लाखाची मदत

कापूस आणि सोयाबीन पिकांवर झालेल्या रोग, अळी आणि किडींवर कीटकनाशकांची फवारणी करताना जीव गमावणाऱ्या यवतमाळमधील १८ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

पिकावरील किडींचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी फवारण्यात येणाऱ्या कीटकनाशकाने शेतकरी आणि शेतमजुरांचा जीव घेतला आहे. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांत १८ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तर ७५० शेतकऱ्यांवर उपचार सुरु असून २५ शेतकऱ्यांना अंधत्व आले आहे. यवतमाळमधील घटनेची शेतकरी संघटनांनी दखल घेत राज्य सरकारकडे पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्याची मागणी केली होती.