धाराशीव जिल्ह्यात केवळ १ रुपया प्रति किलो भाव मिळाल्याने शेतकऱ्याने कांद्याची ६०० पोती जाळून टाकली
धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील तिंत्रज गावात कांदा उत्पादक शेतकरी भगवान साबळे यांनी आपल्या शेतीतून काढलेल्या ६०० गोण्या कांदा जाळून टाकला. बाजारात कांद्याला केवळ १ रुपया प्रति किलो भाव मिळत असल्याने त्यांनी हा संताप व्यक्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्याने कांदा लागवडीसाठी ३ ते ४ लाख रुपये खर्च केले होते. १ रुपयाच्या भावाने विक्री केली तर मोठा तोटा त्यांना होणार होता कारण कांद्याच्या अतिउत्पादनामुळे, साठेबाजी, निर्यातीतील अडचणी आणि बाजारातील गोंधळ यामुळे दर कोसळले आहे. शेतकऱ्याने पंचनामा करून सरकारी मदत मागितली आहे.
महाराष्ट्रात कांद्याचे दर वारंवार कोसळतात. शेतकऱ्यांना उत्पादन खर्च बियाणे, खते, मजुरी, पाणी भरून निघत नाही, तर व्यापारी/ग्राहकांना मात्र २०-५० रुपये किलोने विक्री होते. यासारख्या घटना पूर्वीही घडल्या आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही फार दुर्दैवी घटना आहे घामाच्या पिकाला आग लावणे हे नैराश्य दर्शवते. यावर दीर्घकालीन उपाय आवश्यक आहे.
Edited by-Dhanashri Naik

