गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :चंद्रपूर , मंगळवार, 11 ऑक्टोबर 2022 (11:21 IST)

40 बछड्यांचा बाप हरपला

tadoba forest
चंद्रपूर शहराजवळील सिंहळा गावाजवळील जंगलात ताडोबात आज सकाळी जगप्रसिद्ध वाघडोह वाघाचा मृत्यू झाला आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सुमारे 17 वर्षांच्या या वाघाचा ताडोबा व्याघ्र प्रकल्पात दीर्घ काळ दरारा होता. ताडोबाची मोहर्ली, वाघाडोह हा वाघ त्याच्या चेहऱ्यावर असलेल्या जखमेच्या खुणेमुळे या नावानंदेखील ओळखलं जात होतं. वाघाला ताडोबाचा बिग डॅडी म्हणूनही ओळखले जायचे. वाघडोह हा ताडोबातील किमान 40 पिल्लांचा बाप होता. वृद्धापकाळ आणि अशक्तपणामुळे वाघाडोहला तीन वर्षांपूर्वी इतर वाघांनी ताडोबातून हाकलून दिले होते. तेव्हापासून तो चंद्रपूर शहरालगतच्या जंगलात राहत होता.