मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 29 जून 2021 (08:28 IST)

महाविद्यालयाच्या शुल्कामध्ये सवलत मिळणार

राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंसमवेत सोमवारी बैठक घेतली असून यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी विद्यापीठाशी संलग्न अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयाच्या शुल्का मध्ये सवलत देण्याचे मान्य करण्यात आले आहे. मात्र सवलत किती मिळणार याची माहिती सविस्तर आढावा घेवून मंगळवारी जाहीर करणार असून कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ करण्याबाबतही विचार झाला असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.
 
कोरोनामुळे महाविद्यालये बंद असल्याने ग्रंथालय, प्रयोगशाळा, क्रिडांगण यासह इतर शुल्क कमी करावे अशी मागणी केली जात आहे. कोरोनामुळे शुल्क कमी करावे अशी मागणी गेल्या वर्षापासून विद्यार्थी व पालक सातत्याने करत आहेत. याच पाश्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील शुल्कात २५ टक्के कपात केली आहे.
 
नागपूर विद्यापीठाने ग्रंथालय, प्रयोगशाळा, क्रिडांगण आदी इतर शुल्क कमी केले आहे. याच धर्तीवर सर्वच विद्यापीठांची फी कमी करावी अशी मागणी होती.