शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 फेब्रुवारी 2021 (11:21 IST)

उदय सामंत म्हणतात, मी राज्यपालांचा लाडका मंत्री आहे

महाविकास आघाडी सरकारमधील एका नेत्याने आपण राज्यपालांचे लाडके मंत्री असून, यामुळेच काहीही अडचण येत नाही असं म्हटलं आहे. उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सोलापुरात बोलताना हे वक्तव्य केलं.
 
उदय सामंत यांना पत्रकारांनी तुमचे आणि राज्यपालांचे संबंध कसे आहेत असं विचारलं असता ते म्हणाले की, “मी राज्यपालांचा लाडका मंत्री आहे. त्यामुळे मला काहीही अडचण येत नाही. ज्या काही राजकीय गोष्टी होत आहेत त्या वेगळ्या आहेत. शिक्षण खाते चालवत असताना राज्यपालांशी संबंध येत असतो. माझा वर्षभराचा कार्यकाळ पहिला तर लक्षात येईल माझे आणि त्यांचे चांगले संबंध आहेत”.
 
उदय सामंत यांनी यावेळी विमान उड्डाण मुद्यावरुन सुरु असलेल्या वादावरही भाष्य केलं. ते म्हणाले की, ‘राज्य सरकार आणि राज्यपाल असा संघर्ष नाही. नियमांचा मुद्दा असावा, पण या नियमांची मला माहिती नाही. राज्यपाल देखील नियमानुसार १२ आमदारांच्या नावाच्या शिफारसीवर सही करतील”.