सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021 (07:58 IST)

मनसे म्हणते ‘हा महाराष्ट्र आहे, गुजरात नाही’

भाजपचे माजी आमदार हेमेंद्र मेहता यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी पोस्टरही लावण्यात आले आहेत. या पोस्टरवर गुजराती भाषेचा वापर करण्यात आला होता. मात्र यावर मनसेने काही चिठ्या चिकटवत ‘हा महाराष्ट्र आहे, गुजरात नाही’ अशा मजकूर लिहिला आहे. 
 
माजी आमदार आणि भाजपचे नेते हेमेंद्र मेहता यांनी काही दिवसांपूर्वी भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मेहता यांनी शिवबंधन बांधलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. यानंतर मुंबईतील बोरिवलीत या पोस्टरवर गुजराती भाषेचा वापर केला गेला. यामुळे त्यावर मनसेने काही चिठ्या चिटकवण्यात आल्या. ‘हा महाराष्ट्र आहे गुजरात नाही’ अशाप्रकारचे मजकूर लिहिण्यात आले होते. यामुळे शिवसेना विरुद्ध मनसे वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.