शनिवार, 24 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 नोव्हेंबर 2021 (21:31 IST)

आमदार बबनराव लोणीकर यांच्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याविषयी अपशब्द उच्चारणाऱ्या आमदार बबनराव लोणीकर यांच्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोपेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणं लोणीकरांना चांगलंच भोवण्याची चिन्ह आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुधाकर निकाळजे  यांनी जालन्यातील पोलीस ठाण्यात आमदार बबनराव लोणीकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. संतप्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बबनराव लोणीकर यांच्याविरोधात मोटर सायकल रॅली काढत जाहीर निषेध नोंदवला होता.
 
भाजपचे परतूर येथील आमदार बबनराव लोणीकर यांनी अनेक कार्यकर्त्यांना सोबत घेत, कोणतीही परवानगी न घेता शुक्रवारी जालन्यातील जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. अतिवृष्टीचं नुकसान आणि पिकविम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनादरम्यान त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं.