सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 मे 2019 (17:26 IST)

अखेर विद्यार्थ्यांनी 15 दिवसांनी आंदोलन मागे घेतले

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशावर राज्यपालांनी स्वाक्षरी केल्यानंतर विद्यार्थ्यांनी सुरु असलेले आंदोलन 15 दिवसांनी मागे घेतले आहे. 
 
वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षणातून प्रवेश मिळावा यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. मात्र, राज्य सरकारने वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणातील मराठा आरक्षणानुसार झालेले प्रवेश कायम करण्यासाठी काढलेल्या अध्यादेशावर राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी स्वाक्षरी केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या या अध्यादेशामुळे 2019-20 या वर्षासाठी शिक्षण संस्थांमध्ये पीजी आणि एमबीबीएस प्रवेशात मराठा आरक्षण लागू होणार आहे.