बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 13 डिसेंबर 2023 (17:20 IST)

लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकाला आग, प्रवाशी बचावले

मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकाच्या कॅन्टीनला बुधवारी भीषण आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, स्टेशनच्या बुकिंग आणि वेटिंग हॉललाही आगीने वेढले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रवाशांना स्थानकातून बाहेर काढण्यात आले आणि आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. 
 
मध्य रेल्वेच्या एलटीटी स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील जनआहार कॅन्टीनमध्ये दुपारी 2.45 वाजता आग लागली. कथित आगीच्या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 
 
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ.शिवराज मानसपुरे यांनी जनआहार कॅन्टीनला लागलेल्या आगीला दुजोरा दिला असून दुपारी साडेतीनच्या सुमारास आग आटोक्यात आल्याचे सांगितले.
 
Edited by - Priya Dixit