सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 ऑगस्ट 2023 (21:08 IST)

हिंगोलीत भाजपच्या पदाधिका-यांवर गोळीबार

छत्रपती संभाजीनगरनंतर आता हिंगोलीतही गोळीबाराची घटना घडली असून येथील जिल्हा परिषदेच्या आवारात दुचाकीवर आलेल्या दोघांकडून भाजप युवा मोर्चाच्या पदाधिका-यांवर गोळीबार केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीत भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी हिंगोलीच्या जिल्हा परिषदे पुढे पप्पू चव्हाण यांच्यावर समोरासमोर गोळीबार केला आहे.
 
या घटनेत पप्पू चव्हाण हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पाठीला मोठी इजा झाली आहे. दरम्यान या घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले आहेत. तसेच पोलिस या हल्लेखोराचा शोध घेत आहेत.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor