बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 जून 2018 (16:06 IST)

मासे झाले महाग, खवय्ये नाराज, भाव गगनाला भिडले

पावसाला सुरु झाला आणि मासे पकडणे अवघड झाले आहे. त्यात समुद्रात वादळ असल्याने पुढील अनेक महिने मत्स्यबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये सध्या मासे खाणाऱ्या खवय्यांची कोंडी दिसून येते आहे. मात्र बंदी नंतर ही जे मासे सहज मिळतात, त्याचाही जोरदार  तुटवडा आहे. त्यामुळे माशांचे भाव प्रचंड वाढले आहेत. पावसाळ्यात जून महिन्यापासून नारळी पौर्णिमेपर्यंत समुद्रात मासेमारी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या 3 महिन्यात बाजारात मासे फारच कमी प्रमाणात असतात. त्यात सर्वाधिक बोंबील, मांदेली असे मुंबई आणि आसपासच्या समुद्रात हमखास सापडले जातात. त्यामुळे आधी पकडलेले, बर्फात ठेवलेले मासेच सध्या विक्रीसाठी आहेत. परिणामी त्यांची किंमत प्रचंड वाढली आहे. 20 ते 30 रुपयांची मासळीदेखील शंभरच्याघरात विकली जात आहे.तर त्यातही चूक माणसांची आहे. खारफुटी नष्ट केल्याने  यांत्रिक मासेमारी आणि समुद्रातील प्रदूषण याचा थेट परिणाम माशाच्या प्रजननावर होत आहे. त्यामुळे समुद्रात पावसाळ्यात मिळणारे बोंबील, मांदेलीसारखे मासेदेखील कमी मिळत आहेत. ही धोक्याची घंटा आहे हे असेच सुरु राहिले तर येत्या काही वर्षात हे मासे मिळणे बंद होईल.
 
यामध्ये मांदेली वाटा प्रमाणे पूर्वी 20 रु. मिळत होती आता ती 90 ते 100 रुपये मिळते आहे. बोंबील एक वाटा 30-40 रु असे आता 100 ते 120 रुपये मिळत आहे. सूरमई (1 नग) 100-150 मिळत असे आता 250 ते 300 रुपये मिळते आहे. तर मोठी कोंळबी किलो 200 रु होती आटत 250 रु झाली आहे.