बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 मार्च 2021 (07:48 IST)

सुशील कुमार शिंदे यांची मुलगी आणि जावई यांची कमर्शियल संपत्ती ED कडून जप्त

दिवाळखोरीचा सामना करत असलेली दीवान हाउसिंग फायनांस लिमिटेड (DHFL)चे प्रमोटर्स कपिल आणि धीरज वधावानशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी केंद्रीय आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांची मुलगी प्रिती राज श्रॉफ आणि जावई राज श्रॉफ यांची कमर्शियल संपत्ती ED कडून जप्त करण्यात आली आहे.
 
सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँके (PNB) ने दीवान हाउसिंग फायनांस लि. (DHFL)ला दिलेल्या 3,688.58 कोटी रुपयांच्या कर्जाला फ्रॉड घोषित करण्यात आले आहे. ही तिच कंपनी आहे, ज्याची YES बँकेतील कर्ज आणि घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. कंपनीचे प्रमोटर वधावन बंधु पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि त्यांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने संलग्न केली आहे. YES बँकेतील घोटाळ्याप्रकरणी ED ने बँकेची माजी प्रमुख राणा कपूर आणि DHFL चे प्रमोटर्स कपिल वधावन आणि धीरज वधावनची 2400 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.