दुर्मिळ घटना : गायीनं चार वासरांना जन्म दिला
सोलापूरमधील मोहोळ तालुक्यातील पापरी येथे दुर्मिळ घटना घडली आहे. येथे एका शेतकऱ्याच्या घरी असलेल्या 'लक्ष्मी' नावाच्या गायीनं एकाच वेळी चार वासरांना जन्म दिला आहे.
तीन कालवड आणि एक खोंड अशा मिळून चार वासरांना जन्म दिल्याची पापरी परिसरातील ही पहिलीच आणि दुर्मिळ घटना असल्याने सांगितले जात आहे. गाय आणि वासरांना बघण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. ही गाय सुरेश लोंढे यांची असून ते दरवर्षी लक्ष्मीचा वाढदिवसही साजरा करतात.
मोहोळ तालुक्यातील पापरी गावातील शेतकरी सुरेश मुरलीधर लोंढे यांच्याकडे संकरित गाई, म्हशी अशी मिळून 12 दूध देणारे पशुधन आहे. त्यातील लक्ष्मी नावाच्या एका गायीनं गुरुवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास चार वासरांना जन्म दिला आहे. गायीचे हे चौथे वेत आहे.
photo: symbolic