सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 7 डिसेंबर 2022 (09:39 IST)

सीमावाद चिघळला; महाराष्ट्र-कर्नाटकदरम्यानची बससेवा पुन्हा बंद

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळला असून, आज ‘कन्नड रक्षण वेदिके’ या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला चढवला. या हल्ल्याचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटत आहेत. दोन्ही राज्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने महाराष्ट्र-कर्नाटकदरम्यानची बससेवा पुन्हा बंद करण्यात आली आहे. वातावरण शांत होईपर्यंत बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय दोन्ही राज्यांनी घेतला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor