सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 30 ऑगस्ट 2022 (20:49 IST)

तारीख पे तारीख,महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर

suprime court
महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. मात्र, कर्नाटकच्या वकिलांनी वेळ मागितल्याने आता सुनावणी नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. तब्बल पाच वर्षांनी याप्रकरणी सुनावणी होणार असल्याने समस्त महाराष्ट्र आणि कर्नाटकातील नागरिकांचे लक्ष लागून होते. मात्र, आता ही सुनावणी दोन महिने लांबणीवर पडली आहे.
 
महाराष्ट्र – कर्नाटक प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात २०१७ रोजी शेवटची सुनावणी झाली होती. त्यानंतर पाच वर्षांनी आज सुनावणी झाली. या सुनावणीवेळी ज्येष्ठ वकील राकेश द्विवेदी, शिवाजीराव जाधव यांनी महाराष्ट्र राज्याची बाजू मांडली. तर राज्याकडून अवर सचिव सदाफुलेही उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सुनावणीबद्दल माहिती घेऊन दिल्लीतील वकिलांशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. यावेळी त्यांनी राज्याची बाजू भक्कमपणे मांडण्याची विनंती त्यानी ज्येष्ठ वकिलांना केली.