शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 8 सप्टेंबर 2022 (13:30 IST)

पुरातून निघाली अंतयात्रा

flood funeral
राज्यभरात पावसाने हाहाकार केला आहे. अशात यवतमाळ जिल्ह्यात माळकिन्ही गावात पावसामुळे विदारक दृश्य समोर आले जेथे स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नव्हता अशात नातेवाईकांना अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह घेऊन नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यातून वाट काढावी लागली. लोकांची अशी परिस्थिती बघून नागरिक संताप व्यक्त करत आहे. 
 
महागाव तालुक्यातील माळ किन्ही गावातील अविनाश कलाने यांचा मृत्यू झाला. दिवसभर पाऊस सुरू होता. अशातच अंत्यसंस्कार करण्यासाठी असलेले धनशेड हे नाल्याच्या पैल तिरी आहे शिवाय इतरत्र जागा नसल्यामुळे नाल्याच्या पुरातून वाट काढत दहन शेडमध्ये अंत्य संस्कार करण्याची वेळ आली.
 
नाल्याच्या पुरातून छातीपर्यंत असलेला पाण्यातून नातेवाईकांनी मृतदेह खांद्यावर घेऊन वाट काढत अंत्यसंस्कार केले. या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.