शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 21 मे 2022 (14:47 IST)

हळदीच्या कार्यक्रमाला जाताना कारचा अपघात 8 ठार 5 जखमी

धारवाड जवळ झालेल्या कार अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. वेग जास्त असल्याने क्रुझरचा तोल सुटून ती झाडावर आदळली. या गाडीतील 8 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले आहे. हे सर्व लोक हळदीच्या कार्यक्रमात सहभागी होऊन गावी परतत होते. 
 
गाडीतील सर्व जण हळदीच्या कार्यक्रमाला गेले होते. धारवाडमधील बाड गावाजवळ हा अपघात  झाला. जखमींवर धारवाडमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या भीषण अपघातत जागेवर 7 जणांचा आणि उपचार सुरु असताना 1 व्यक्तीचा मृत्यू झाला.