शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 14 ऑगस्ट 2023 (21:35 IST)

नाशिककरांसाठी आनंदाची बातमी; गंगापूर धरण ‘इतके’ टक्के भरले

नाशिककरांसाठी आनंदाची बातमी आहे.गंगापूर धरणातील साठा वाढू लागला असून शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 90टक्के भरले आहे. पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे गंगापूर धरण 90टक्के भरले तर आहे  तर गंगापूर धरण समूहात एकुण 76 टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. दारणा धरणात 93 टक्के इतका जलसाठा झाला आहे.
 
जिल्ह्यातील भावली,केळझर,हरणबारी ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. पालखेड39,करंजवण 56, वाघाड72,ओझरखेड 36,पुणेगाव92,चणकापूर 75, पुनद 54 टक्के भरले तर गिरणा धरणात आतापर्यंत फक्त 34टक्के पाणीसाठा असून ती चिंतेची बाब म्हणावी लागेल.जिल्ह्यातील धरणांमध्ये आतापर्यंत 63 टक्के इतका साठा झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा साठा सरासरी 89 टक्के इतका होता. याचाच अर्थ गेल्या वर्षीच्या तुलनेने ऑगस्टच्या मध्यापर्यंत 26टक्के इतका पाणीसाठा कमी आहे.
 
राज्यातील इतर भागांच्या तुलनेने नाशिक जिल्ह्यातअजूनही म्हणावा तितका समाधानकारक पाऊस पडलेला नाही. थोडी उघडीप पडली असली आणि शेतीच्या कामांना वेग असला तरी अजूनही बळीराजा दमदार पावसाची अपेक्षा करीत आहे.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor