शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 15 जुलै 2021 (20:09 IST)

बलात्काऱ्यांना राजश्रय देण्याचे काम सरकार करत आहे : चित्रा वाघ

भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी बलात्काऱ्यांना राजश्रय देण्याचे काम सरकार करत  असल्याचा आरोप केला. महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा आणला जात आहे. मात्र हा कायदा महिलांना संरक्षण देण्याच्या ऐवजी गुन्हेगारांनाच पाठीशी घालण्यासाठी होत असल्याचे त्या म्हणाल्या.
 
ठाणे महापालिकेच्या कोवीड हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स म्हणून काम करणाऱ्या महिला कर्मचऱ्यासोबत ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त यांनी अश्लील वर्तन केले.
हे प्रकरण चित्रा वाघ यांनी उजेडात आणल्यानंतर त्या म्हणाल्या की, ‘हे एक प्रकरण नसून महाराष्ट्रात अशा प्रकारे अनेक महिलांवर अत्याचार होत असून ठाण्याच्या प्रकारणाबरोबरच सर्वच प्रकरणात भाजप महिलांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.