मंगळवार, 11 मार्च 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 21 सप्टेंबर 2022 (22:40 IST)

फडणवीस राज्यासोबतच देशासाठी योगदान देण्याचे राज्यपालांचे सूचक विधान

फडणवीस हे देशासाठी आशेची किरण आहे. देवाची इच्छा असल्यास राज्यासोबत ते देशासाठी काही तरी योगदान करतील असं मी राजकारणात आल्यापासून मला वाटतं.असं सूचक विधान राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी डॉ. तुषार कांती बॅनर्जी लिखित  ‘भगत सिंह कोश्यारी : ए सोल डेडीकेटेड टू द नेशन’ या पुस्तकाचं प्रकाशन समारंभात दरबार हॉल, राजभवन, मुंबई येथे बोलताना केलं. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती  दर्शवली. 

राज्यपालाच्या या विधानामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहेत. फडणवीस येत्या काही काळात केंद्रीय पातळीवरती काम करणार की काय अशी चर्चा सुरु झाली आहे. या कार्यक्रमात फडणवीस यांनी राज्यपालांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्यांनी फक्त समाज आणि राष्ट्राचा विचार केला आणि आरएसएसशी जोडले गेले. त्यांनी देशसेवा करत आपली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे निभावली. 

राज्यपाल इकडे 3 वर्षांपूर्वी आले, त्यामधील 2 वर्षे कोरोनात गेली, सर्व त्यांना सांगायचे बाहेर पडू नका, एक वेळ अशी होती सरकारचे मुख्यमंत्री आणि मंत्री देखील कुठे जात नव्हते पण राज्यपाल मात्र सगळीकडे जायचे.अशी खूप कमी व्यक्ती आहेत ज्यांनी चारही संसद पाहिल्या आहेत. कोश्यारी जिथे जातात तिथे लोकांना आपलेसे करतात. ते या वयात देखील सकाळी 4 वाजता उठतात. त्यांनी खूप कमी वेळात मराठी शिकली. अशा शब्दात त्यांनी राज्यपालांचे कौतुक केले.