सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 4 मे 2022 (15:20 IST)

गणेश नाईक यांना मोठा दिलासा, अटकपूर्व अर्जावर जामीन मंजूर

ganesh naik
भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. परंतु हायकोर्टाच्या निर्णयामुळे गणेश नाईक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गणेश नाईक यांच्यावर महिलेकडून अत्याचार आणि बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला होता. गणेश नाईक यांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली. अटकपूर्व अर्जावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
 
भाजप आमदार गणेश नाईक यांना हायकोर्टाने 25 हजारांच्या हमीवर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. गणेश नाईक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी गणेश नाईक यांचे अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे न्यायालयाने शनिवारी फेटाळला होता. हायकोर्टात गणेश नाईक यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात आली होती. यावेळी न्यायालयाने त्यांना मोठा दिलासा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गणेश नाईक यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. परंतु हायकोर्टाच्या निर्णयामुळे गणेश नाईक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गणेश नाईक यांच्यावर महिलेकडून अत्याचार आणि बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला होता. गणेश नाईक यांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली. अटकपूर्व अर्जावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. भाजप आमदार गणेश नाईक यांना हायकोर्टाने 25 हजारांच्या हमीवर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. गणेश नाईक यांना मोठा दिलासा मिळाला आहे.