मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 9 एप्रिल 2022 (17:47 IST)

गुणरत्न सदावर्ते यांना कोर्टानं पोलीस कोठडी सुनावली

gunratna sadavarte
राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या गोंधळ प्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयानं दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या सह अटक केलेल्या 103 कर्मचाऱ्यांचा समावेश देखील आहे. गुणरत्न सदावर्ते यांना न्यायधीश कैलास सावंत यांनी 11 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 
 
राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी जाऊन गोंधळ घालत्यामुळे पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या सांगण्यावरून गोंधळ घातल्याप्रकरणी 109 एसटी कर्मचाऱ्यांना आणि त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना ,काल पोलिसांनी अटक केली.त्याची सुनावणी आज सत्र न्यायालयात पार पडली. या वेळी सरकारच्या वतीने वकील प्रदीप घरत हे युक्तिवाद करत होते तर सदावर्ते यांच्या वतीने 7 वकील उभे होते.
 
या न्यायालयात सदावर्ते यांना 11 एप्रिल पर्यंत म्हणजे दोन दिवसीय पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी मला डायबिटीजची औषधे दिली नाही. तसेच घरातून ताब्यात घेताना मला इजा झाली असे आरोप केले आहे.