1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021 (21:46 IST)

मुंनगंटीवार आणि मुख्यमंत्री यांच्या मध्ये अर्धा तास बैठक, चर्चेला उधाण

Former Finance Minister Sudhir Mungantiwar and Chief Minister Uddhav Thackeray
शिवसेना आणि भाजप यांच्यात सातत्याने आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. मात्र याच दरम्यान  दोन नेत्यांच्या अचानक भेटीने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. ही चर्चा बंद दाराआड असल्याने याला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. 
 
माजी अर्थमंत्री सुधीर मुंनगंटीवार  आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्यामध्ये अर्धा तास बैठक झाली. बंद दाराआड सह्याद्री अतिथीगृहावर दोघांमध्ये ही बैठक झाली. या अचानक भेटीनं राजकीय चर्चा सुरु झाली आहे. पण जिल्ह्यातील विकास कामांसाठी भेटल्याचे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. या बैठकीत फक्त माझ्या मतदार संघतील विकास कामांसंदर्भात चर्चा झाली. तसेच चंद्रपूर विमानतळासह इतर विषयांसंदर्भात देखील चर्चा झाल्याची मुनगंटीवार यांनी माहीती दिली आहे.