शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019 (08:59 IST)

ठाण्यात व्हॅलेंटाइन डे निमित्ताने शुभ विवाह

व्हॅलेंटाइन डे निमित्ताने ठाणे विवाह नोंदणी कार्यालयात ४८ जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. या जोडप्यांत आंतरजातीय विवाह करणाऱ्यांची संख्या ३५ आहे. मागच्या वर्षी व्हॅलेंटाइन डे ला विवाह नोंदणी कार्यालयात २२ आंतरजातीय विवाह झाले होते. त्यात यंदाच्या वर्षी १३ ने वाढ झाली आहे.
 
आगाऊ सूचना देऊन व्हॅलेंटाइन डे ला विवाह करणाऱ्याची संख्या १३ होती. गतवर्षी आगाऊ सूचना देऊन विवाह करणाऱ्याची संख्या २३ होती. त्यात यंदाच्या वर्षी घट झाली आहे. मात्र, अनेकांनी ‘चट मंगनी, पट ब्याह’ या पद्धतीने व्हॅलेंटाइन डे चा मुहूर्त साधला आहे. ज्यांना इच्छा असूनही व्हॅलेंटाइन डे चा मुहूर्त साधता आला नाही, ते येत्या तीन दिवसांत नोंदणी पद्धतीने विवाह करतात. नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचा कल वाढतोय, ही अत्यंत समाधानकारक बाब आहे, अशी माहिती ठाणे विवाह नोंदणी कार्यालयातील वरिष्ठ लिपिक जी.आर. पवार यांनी दिली.