शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 फेब्रुवारी 2023 (21:27 IST)

काय म्हणता, नाशिकमधून ठाकरे गटाला पुन्हा धक्का

uddhav thackeray
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या दौऱ्यापूर्वीच नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा एक धक्का बसला आहे. माजी नगरसेविका हर्षदा गायकर सह युवती सेनेच्या अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. एकीकडे नाशिकमध्ये संजय राऊत ठाकरे गटातील डॅमेज कंट्रोल करण्यासाठी येत आहे. मात्र त्या आधीच ठाकरे गटात डॅमेजचा सिलसिला सुरूच आहे.
 
माजी नगरसेविका हर्षदा गायकर सह युवती सेनेच्या अनेक महिला पदाधिकारी शिंदे गटाची वाट धरली.  हर्षदा गायकर या युवती सेनेच्या उपजिल्हाध्यक्ष असून नाशिकमध्ये ठाकरे गटाला हा धक्का मानला जात आहे. 
 
संजय राऊत २ दिवशीय नाशिक दौऱ्यावर आहेत. एकीकडे राऊत आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाविरोधात रणनीती आखणार असल्याचे बोलले जात आहे. शिंदे गटात गेलेल्या माजी नगरसेवकांच्या प्रभागांचा देखील आढावा घेणार असल्याची, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाला नाशिकमध्ये सुरु असलेली गळती कायम आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor