बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 26 डिसेंबर 2021 (12:02 IST)

गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर हल्ला, जीवे मारण्याचा गंभीर आरोप केला

महाराष्ट्राचे भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी बुधवारी सायंकाळी त्यांच्या वाहनांवर दगड फेक केल्याचा आरोप केला आहे. ही घटना सोलापुरात बुधवारी सायंकाळी घडली. सुदैवाने या हल्ल्यात त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. 
 या  घटनेत त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या गेल्या आहे. बुधवारीच गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती.
भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी सोलापूर येथील माता वस्ती येथे सभेला जाण्यासाठी गाडीतून जात असता त्याचवेळी काही अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. त्यांच्या गाडीवर कोणीतरी मोठा दगड फेकला. त्यामुळे गाडीच्या काचा फुटल्या. सुदैवाने या घटनेत त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.तर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले.
भाजप नेत्याचे म्हणणे आहे की मला माहित नाही की त्यांच्या गाडीला का लक्ष्य केले गेले. तसेच त्यांना हल्लेखोरांबद्दल काहीही माहिती नाही. पण मला जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप भाजप नेते पडळकर यांनी केला आहे. त्यांनी सोलापुरात कोणाला ओळखत नसल्याचे सांगितले किंवा त्याचे इथे कोणाशीही वैर नाही.