बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 26 डिसेंबर 2021 (10:39 IST)

धक्कादायक! पाच महिन्यांच्या चिमुकल्याची अज्ञाताकडून निर्घृण हत्या

ठाण्यातील कळवा येथील साईबाबानगर येथे झोपडपट्टीत राहणाऱ्या शंकर आणि शांती दाम्पत्याच्या लहानशा पाच महिन्यांच्या चिमुकल्याचा अज्ञात इसमाने पाणाच्या टाकीत बुडवून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे .  शंकर हा बिगारीचे काम करतो. आणि आपल्या पत्नी, चार वर्षाचा मुलगा आणि पाच वर्षाच्या मुलगी आणि पाच महिन्यांच्या चिमुकल्यासह राहतो. 24 डिसेंबरला दुपारी हा चिमुकला घरात झोपलेला असता कोणी तरी त्याला घरातून पळवून नेले. त्यावेळी या चिमुकल्याची आई शेजारी गेली होती.  हा लहानगा मुलगा बेपत्ता झाला होता. खूप शोधाशोध घेतल्यावर मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार या दाम्पत्याने कळवा पोलीस ठाण्यात नोंदवली . पोलिसांनी आपल्या परीने शोध घेताना त्यांना पाण्याच्या एका बॅरल मध्ये या मुलाचे मृतदेह आढळले. या मुलाला अज्ञात इसमाने  पाण्याच्या टाकीत बुडवून ठार मारले होते. मृतदेह पाहतातच आई ने हंबरडा फोडला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पूर्व वैमनस्यातून हे कृत्य केले गेले असावे अशी शक्यता वर्तवली जात आहे.  पोलिसांनी सांगितले की लवकरच आरोपीचा शोध लावून त्याला अटक करण्यात येईल .