मंगळवार, 7 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 जुलै 2021 (19:01 IST)

हेलिकॉप्टरचा अपघात, एकाचा मृत्यू, महिला पायलटची प्रकृती गंभीर

/helicopter crashes
महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील चोपडा तहसीलच्या वरडी शिवरात वनक्षेत्रात शुक्रवारी हेलिकॉप्टरचा अपघात झाला. हेलिकॉप्टर कोसळले आणि खेड्यापासून दूर असलेल्या शेतात पडले. प्राथमिक माहितीनुसार, अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. तथापि, अद्याप याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
 
एक महिला पायलट गंभीर जखमी आहे, तिला जवळच्या खेड्यातील आदिवासींनी वाचवले आणि जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्याचवेळी घटनेची माहिती मिळताच तहसीलदार, पोलिस यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर एनएमआयएमएस अकादमी ऑफ एव्हिएशनचे सांगितले जात आहे.