तणावग्रस्तांच्या यादीत मुंबईकर अव्वल
मुंबई- सर्वाधिक तणावाखाली काम करणार्या नोकदरांच्या यादीत पहिल्या स्थानावर असल्याचे उघडकीस आले आहे. लीब्रेट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या सर्वेक्षणातूनही माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबईकरच जास्त टेन्शन घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबईतील सुमारे 31 टक्के कर्मचारी तणावग्रस्त असल्याची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. सर्वेक्षणातील आकडेवारीवरुन मुंबईसोबतच देशातील इतर महानगरांमधील नोकरदार वर्गदेखील तणावग्रस्त जीवन जगत असल्याचे धक्कादायक वास्तव अधोरेखित झाले आहे.
मुंबईतील 31 टक्के नोकरदार तणावाखाली काम करतो. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीचा यानंतर क्रमांक लागतो. दिल्लीतील 27 टक्के कर्मचारी तणावग्रस्त असून त्यानंतर बंगळुरु 14 टक्के, हैदराबाद 11 टक्के, चेन्नई 10 टक्के आणि कोलकता 7 टक्के यांचा क्रमांक लागतो.