मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 मार्च 2021 (19:55 IST)

गृहमंत्री ने सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले -परमबीर सिंग

गृह मंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी रुपये  वसुलीचे टार्गेट दिले असल्याचा खळबळजनक आरोप पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी केला आहे.मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे ही माहिती परमबीर सिंग यांनी दिली आहे. 

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्याना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांची तक्रार केली आहे. त्यांनी या पत्रात सांगितले आहे की देशमुख यांनी सचिन वाझे यांना हॉटेल,बार आणि पब कडून प्रत्येकी 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते. दुसरीकडे देशमुख परमबीर सिंग यांच्या आरोपांना फेटाळून स्वतःचा बचाव करीत आहे. 

अली कडेच पोलिस आयुक्त पदावरून हटविण्यात आलेले पोलिस अधिकारी परमबीर सिंग यांना होमगार्ड म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे आणि त्यांचा जागी हेमंत नगराळे यांना मुंबई पोलीस आयुक्त पद देण्यात आले आहे.