1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 19 जून 2024 (13:57 IST)

महाराष्ट्रामध्ये भीषण अपघात, ट्रक ने 8 महिलांना चिरडले, 6 महिलांचा मृत्यू

accident
Maharashtra Solapur Accident : महाराष्ट्रात झालेल्या भीषण अपघातामध्ये सहा महिलांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी ट्रक चालकाला घेतले ताब्यात.
 
Maharashtra Accident : महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये झालेल्या भीषण अपघातात सहा महिलांचा मृत्यू झाला आहे. पीडित महिला शेतातील काम आटपून गावाला जाण्यासाठी बसची वाट पाहत होत्या. तेव्हाच जलद गतीने येणाऱ्या ट्रक ने रस्त्याला उभ्या असणाऱ्या महिलांना चिरडले. या सहा महिलांचा जागीच मृत्यू झाला. जेव्हा की दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहे. 
 
हा अपघात सोलापुर जिल्ह्याच्या सांगोला तालुका मध्ये पंढरपुर-कराड रोड वर झाला आहे. सर्व पीडीत  महिला शेतकरी मजूर आहे.  हा अपघात मंगळवारी संध्याकाळी घडला.  पंढरपुर-कराड रोड वर सांगोलाच्या  चिकमहुड गावाजवळ घडला. सांगोला तालुकाच्या कटफल परिसरात आठ महिला शेतात जाण्यासाठी सकाळी निघाल्या संध्याकाळी काम आटपून त्या घरी जाणयासाठी बस ची वाट पाहत होत्या तेव्हा अपघात झाला. 
 
पंढरपुर कडून कराड जाणारा ट्रक (एमएच 50 एन 4757) चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि रस्त्यावर असणाऱ्यांना महिलांना जाऊन धडकला. या अपघाताची माहिती मिळतच सांगोलाचे तहसीलदार संतोष कणसे आणि सांगोला पोलीस निरीक्षक दलबलसोबत अपघातस्थळी पोहचले. नागरिकांच्या मदतीने या महिलांना तात्काळ रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले. पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे.