रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 6 जानेवारी 2024 (12:41 IST)

मी प्रभू श्री रामाबद्दल वाईट बोललो नाही. कोणाकोणाला तुरुंगात टाकणार आहात? : जितेंद्र आव्हाड

jitendra awhad
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री रामाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. जितेंद्र आव्हाडांना धमक्याही देण्यात येत आहेत. आता आव्हाडांनी धमकी देणाऱ्यांचा समाचार घेतला आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
 
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “मी काय चुकीचं बोललो आहे? की माझी हत्या करण्यापर्यंत तुम्ही पोहचला आहात. तुम्ही माझ्याशी वाद घाला. मी कालपासून अपमान सहन करत होतो. कोण कोणता परमहंस माझं शीर उडवण्याबद्दल बोलला. पण, मी रामभक्त आहे, त्यामुळे मला मर्यादा आहेत. मी प्रभू श्री रामाबद्दल वाईट बोललो नाही. कोणाकोणाला तुरुंगात टाकणार आहात?”
 
“स्त्रीचा आदर कसा करावा, जातीभेद कशी मानू नये, हे सगळं रामायणात आहे. प्रभू श्री राम हे आदर्श आहेत. आम्ही बहुजनांचा राम मानतो. 14 वर्षे बहुजन प्रभू श्री रामाबरोबर होता. प्रभू श्री राम हे क्षत्रिय होते. आम्हीही अयोध्येला जाणार आहोत,” असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं.

Edited By -  Ratnadeep ranshoor