मला निवृत्ती मिळायला हवी होती पण तरीही मी या राज्यपाल पदावर काम करतोय -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
मी राज्यपाल पदावर काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यपाल पदावर सेवाभावी कार्यकर्त्यांना संधी द्यायला हवी, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. अहमदनगरमधील स्नेहालय संस्थेच्या वतीने युवा प्रेरणा शिबिरात ते बोलत होते. या शिबिराचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोरी यांच्या हस्ते करण्यात आले.
राज्यपाल म्हणाले की, समाज सुधारवण्याचे काम युवकांना करावं लागणार आहे. मला निवृत्ती मिळायला हवी होती पण तरीही मी या राज्यपाल पदावर काम करतोय. खरंतर पंतप्रधान मोदींनी माझ्यापेक्षा स्नेहालय संस्थेच्या गिरीश कुलकर्णी यांच्यासारख्या व्यक्तीला राज्यपाल करायला हवं. त्यांनी समाजासाठी खूप मोठं काम केलंय.
देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी साजरा करत असताना देशाने प्रगती केली आहे. विशेष करून मागी सात-आठ वर्षांत देशाने भरपूर प्रगती केली. ज्या घरात वीज नव्हती तिथं वीज आली. शौचालय आले. ३३ कोटी लोकांचे बँकेत खातं सुरू करण्यात आले. असं असताना आपल्या शेजारील देशसुद्धा समृद्ध व्हावेत, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले.