रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 ऑगस्ट 2022 (19:33 IST)

घरावर झेंडा लावताना वृद्ध इसमाचा मृत्यू

हर घर तिरंगा आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी हरघर तिरंगा लावण्याचा उपक्रम मोठ्या जल्लोषात सुरु आहे. सध्या घरोघरी तिरंगा लावण्याचा अभियान सुरु आहे. या अभियानाने प्रेरित होऊन जव्हार तालुक्यातील नांदगाव पैकी राजेवाडी या गावातील 65 वर्षीय वृद्ध इसम घरावर झेंडा लावताना कौले फुटून खाली पडून त्यांचा मृत्यू झाला. लक्ष्मण भाऊ शिंदे (65)असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. लक्ष्मण शिंदे हे महानगर टेलिफोन निगम लिमिटेड या कार्यालयात सेवेतून 5 वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते. हर घर तिरंगा या अभियानांतर्गत लक्ष्मण शिंदे हे शनिवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास, आपल्या राहत्या घरी तिरंगा लावण्यासाठी कौलावर चढले असताना कौल फुटल्याने खाली जमिनीवर पडले आणि  त्यानां  गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने नाशिकच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचाराधीन त्यांची प्राण ज्योत माळवली.