सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 30 जुलै 2022 (08:42 IST)

पूरग्रस्त भागात कधी जायचं ते मी ठरवेन, मुख्यमंत्र्यांनी नाक खुपसू नये - अजित पवार

ajit pawar
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ मदत करावी, अशी मागणीही अजित पवारांनी केली.
 
यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "अजित पवार आता पूर ओसरल्यावर पाहायला गेले आहेत. पूर आला होता तेव्हाच आम्ही जाऊन पाहणी करून आलोय."
 
मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरावर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय. अजित पवार म्हणाले की, "मी विरोधीपक्ष नेता म्हणून दौरा करतोय, मी हाडाचा शेतकरी आहे. अधिवेशन सुरु होईल तेव्हा सांगायला सोपं जातं. तर मी कधी जावं हा माझा प्रश्न आहे, बाकीच्यांनी नाक खुपसू नये."
 
कोण कधी गेला, हे बालीशपणानं विचारण्यापेक्षा शेतकऱ्यांना तातडीनं मदत करा, असंही अजित पवार म्हणाले.