शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

आयडिया कॉलेजचे ४ दिवसीय वार्षिक प्रदर्शन

विद्यार्थ्यांनी सृजनशीलता जोपासावी - फेगडे
स्थापत्यकलेचा अभ्यास करतांना विद्यार्थ्यांनी सृजनशीलता जोपासली पाहिजे असे मत वास्तूविशारद मकरंद फेगडे यांनी व्यक्त केले आहे. आयडिया कॉलेजच्या ‘एक्सक्लेम २०१७’ उद्घाटनाच्या निमित्ताने ते बोलत होते. विद्यावर्धन ट्रस्ट यांचे इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन इनव्हारमेन्ट अॅण्ड आर्किटेक्चर (Institute for Design Environment and Architecture) अर्थात आयडिया कॉलेजचे वार्षिक प्रदर्शन कुसुमाग्रज स्मारक, गंगापूररोड, नाशिक येथेआयोजित करण्यात आले आहे.   

यावेळी जयेश शहा, फोकाय आर्ट गॅलरी, शाहानूर सिरामिकचे संचालक,  महाविद्यालयाचे डीन विवेक पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.  

माणसाच्या उत्क्रांतीपासून त्याचा अधिवास अर्थात त्याच घर हेच त्याच्या  विकासचे प्रतिक बनलेले दिसते. तो ज्या वातावणात राहतो त्यातनुसार तो घर बांधत आला आहे. अगदी गुहेत राहत असल्यापासून आताच्या सर्व सोईसुविधांनी नटलेली आणि आकाशाला भिडणारी घरे त्यांने बांधली आहेत. हाच स्थापत्यकलेचा इतिहास या प्रदर्शनात जिवंत केला आहे.   

स्थापत्यकलेमधील अकरा शैलीवर भर देत जगप्रसिध्द वास्तुविशारद आणि त्याच्या प्रतिकृती येथे उभारण्यात आल्या आहेत. यात पहिली प्रतीकृती शैली नीओ क्लासिक वास्तूमधील अलटेस म्यूझिअम असून वास्तुविशारद कार्ल स्निकनर, बर्लिन जर्मनी येथे १८२३ ते १८३० या काळात वास्तू बांधण्यात आली आहे. यात वास्तूमध्ये बांधण्यात आलेला डोम हा बाहेरून दिसत नाही. टेटलीन टॉवर हे रशियात बांधण्यात आले असून यातून पुढे स्थापत्यकलेतील अनेक डिजाईन तयार झालेली आहेत. बाहाउस यामध्ये बांधकाम त्यावेळी पहील्यांदाच काचेचा वापर करण्यात आला. सोबत अत्यंत साधेपणाने त्याची उभारणी करण्यात आलेली आहे. प्रसिद्ध वास्तू विशारद क्युबीझम याची वास्तू द सेन्तेरिया यात पहील्यांदाच स्टीलचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर किंबेल आर्ट म्यूझिअम हे टेक्सासमध्ये असून याची बांधकामात करण्यात आलेली प्रकाश योजना हे वैशिष्ट्य आहे. सीग्राम बिल्डींग ही न्यूयॉर्कमध्ये असून जगातील उंच इमारतीमध्ये तिची गणना होते. लोयोला चॅपल हे भारतातील केरळमध्ये असून याची उभारणी स्थानिक साहित्यापासून करण्यात आलेली असून अत्यंत साधेपणा आहे. चर्च ऑन वॉटर हे जपानमध्ये असून निसर्ग आणि वास्तूची याची सुंदर सांगड घातलेली दिसून येते. याशिवाय सिडनीतील प्रसिद्ध ओपरा हाउस हा वास्तू कलेचा उत्तम नमुना मानला जातो.