शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 15 डिसेंबर 2020 (16:20 IST)

ओबीसी आरक्षणात कोणी वाटेकरी केला तर आम्ही रस्त्यावर उतरु : फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणात कोणी वाटेकरी केला तर आम्ही रस्त्यावर उतरु असा इशारा दिला आहे. “ओबीसी आरक्षणात कोणी वाटेकरी होणार नाही हे सरकारने आपल्या मंत्र्यांना सांगितलं पाहिजे. पण जर कोणी वाटेकरी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही रस्त्यावर उतरु, आम्ही मान्य करणार नाही,” असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
 
“आमच्या काळात मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात कोणती स्थगिती आली नाही. पण आता घटनापीठाकडे जात असताना स्थगिती आली आणि अनेक प्रश्न निर्माण झाले. ज्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत त्या मराठा तरुणांवर सरकारमुळे घरी बसण्याची वेळ आली आहे. सरकारनेच कोर्टात आम्ही भरती करणार नसल्याचं सांगितलं. आ बैल मुझे बार प्रकारे कोर्टाने विचारलेलं नसतानाही राज्य सरकारने सांगून टाकलं. यामुळेच प्रक्रिया पूर्ण झालेले मराठा तरुण आज बसलेले आहेत आणि सरकार त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार नाही,” असं फडणवीसांनी यावेळी सांगितलं.