शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 27 फेब्रुवारी 2021 (22:11 IST)

राजीनामा घेतला नाहीतर विधान भवनात सरकारला तोंड उघडू देणार नाही : चंद्रकांत पाटील

पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांच्यावर कारवाई केली नाही त्यांचा राजीनामा घेतला नाहीतर विधान भवनात सरकारला तोंड उघडू देणार नाही तसचे सरकारला बाकीचे कामकाज चालू देणार नाही असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. किशोर वाघ यांच्यावर कारवाई करुन चित्रा वाघ यांना त्रास दिला जात आहे. कारवाई करुन धमकी देऊन आवाज दाबता येणार नाही. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली त्यामुळे कारवाई करत त्यांना अडणीत टाकण्याचा प्रयत्न सरकारद्वारे केले जात आहे. असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
 
अनेक गुन्हे दाखल झाले असून सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कारवाई करत नाही. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही पूजा चव्हाण प्रकरणात काही बोलत नाही आहेत. असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. पूजा चव्हाणची आत्महत्या की हत्या हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर वानवडीच्या रुग्णालयात नेले, त्या रुग्णालयात १५० कॅमेरे आहेत त्याचे फुटेज कुठे आहेत? तर पूजाने आत्महत्या केली त्या घटनास्थळावरील दोघो कुठे आहेत. ते कुठे गेले गायब झाले जर ते गायब झाले आहेत. तर त्यांच्या गायब होण्यामागे कोणाचा हात आहे. असे अनेक प्रश्न भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केले आहेत.