किरीट सोमय्यांनी पुरावे न दिल्यास 1 रुपयांचा दावा ठोकणार : लोंढे
राज्य सरकारला मिळणाऱ्या वसुलीच्या रकमेची टक्केवारी किरीट सोमय्या यांनी एका वृत्तवाहिनीवरील डिबेटमध्ये जाहीर केली होती. राज्य सरकारला मिळणाऱ्या वसुलीच्या रकमेपैकी 40 टक्के रक्कम शिवसेनेला मिळते. 40 टक्के रक्कम राष्ट्रवादीला मिळते, तर 20 टक्के रक्कम काँग्रेसला मिळते, असा आरोप सोमय्या यांनी डिबेटमध्ये केल्याचं लोंढे यांनी सांगितलं. सदर आरोप करत असताना त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे पुरावे नव्हते. सार्वजनिकरित्या असे खोटे आरोप करणं काँग्रेस खपवून घेणार नाही, अशी तंबी लोंढे यांनी सोमय्यांना दिली.
सोमय्या नेहमीच खोटे आरोप करत असतात. त्यांनी केलेले खोटे आरोप रेक्रार्ड केले असून, याची तक्रार नागपूर पोलीस आयुक्तांक डे केली असल्याचं अतुल लोंढे म्हणालेत. किरीट सोमय्या यांच्याविरोधात फौजदारी आणि दिवाणी बदनामी करणारे गुन्हे दाखल करण्याची मागणी लोंढे हे न्यायालयात करणार आहेत. टीव्ही डिबेटमध्ये किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर वसुलीचा आरोप केला होता. केलेल्या आरोपाचे किरीट सोमय्या यांनी पुरावे द्यावे ,अन्यथा माफी मागावी असेही लोंढे म्हणाले. किरीट सोमय्यांनी पुरावे न दिल्यास 1 रुपयांचा दावा ठोकणार असल्याचं अतुल लोंढे म्हणाले.