सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 सप्टेंबर 2022 (07:47 IST)

राममंदिरातून चोरीला गेलेल्या मूर्ती सापडल्या नाही, तर पोलिसांचा हिशोब करावा लागेल-भाजपा आमदार

जांब समर्थ येथील राम मंदिरातील सात पंचधातूंच्या मूर्ती चोरी गेल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. श्री समर्थ रामदास स्वामी पूजा करीत असलेल्या श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमानाच्या पंचधातुच्या मूर्ती चोरट्यांनी लंपास केल्या. मात्र, अद्याप चोरांचा तपास लागला नाही. यावरुनच भाजपा आमदार यांनी पोलिसांना इशारा दिला आहे.
 
“जालन्यातील जांब समर्थ येथील राममंदिरातून चोरीला गेलेल्या मूर्ती सापडल्या नाही, तर पोलिसांचा हिशोब करावा लागेल”, असा इशारा  भाजपा आमदार बबन लोणीकर यांनी पोलिसांना दिला आहे. परतूर तालुक्यातील सोयंजना येथे आयोजित करण्यात आलेल्या हरीकीर्तनाच्या कार्यक्रमात ते उपस्थित होते. त्यावेळेस त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
श्री राम, सितामाता, लक्ष्मण व हनुमान यांच्या पंचधातूच्या सहा मूर्ती होत्या.
ऐतिहासिक मंदिरातून पंचधातूच्या 6 मूर्तींची चोरी झाल्याने भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तीर्थक्षेत्र जांबसमर्थ हे श्री समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव आहे. जांबसमर्थ मंदिर, श्रीराम मंदिरात इ.स. 1535 मधील श्री राम, सितामाता, लक्ष्मण व हनुमान यांच्या पंचधातूच्या सहा मूर्ती होत्या. विशेषत: श्री समर्थ रामदास स्वामी भिक्षा मागत असताना भिक्षापात्रात ठेवली जाणारी आणि हाताच्या दंडावर बांधली जाणारी हनुमानाची मूर्तीही या मंदिरात होती.