शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 28 ऑगस्ट 2022 (15:24 IST)

उत्तर प्रदेश : स्टेशनवरून 7 महिन्याच्या लहान बाळाची चोरी

baby legs
उत्तर प्रदेशातील मथुरा रेल्वे स्थानकावरून आईजवळ झोलेल्या 7 महिन्याच्या चिमुकल्या बाळाची चोरी झाल्याची मोठी घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. प्लॅटफॉर्मवर कोणीही नाही. बाळाच्या चोरीच्या प्रकरणावरून जीआरपी आणि आरपीएफच्या सुरक्षाव्यवस्थांवर प्रश्न निर्माण झाले आहे. या प्रकरणी बाळाची आईने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, फरहा पोलीस स्टेशन अंतर्गत परखम गावातील राधा बुधवारी पहाटे कासगंज पॅसेंजर ट्रेन ने आपल्या पती आणि मुलासह मथुरा पोहोचली.अंधार झाल्यामुळे हे कुटुंब प्लॅटफॉर्मवरच झोपले.अवघ्या 7 महिन्यांचा चिमुकला संजय हा आईच्या जवळ झोपला होता. प्लॅटफॉर्मवर कोणीच नव्हते. या दरम्यान एक अज्ञात व्यक्ती त्यांच्याजवळ आला आणि इकडे तिकडे बघून बाळाला पळवून नेले. मुलगा जवळ नाही हे बघून त्यांना खळबळून जाग आली आणि बाळाचा शोधाशोध करण्यास सुरुवात झाली. बाळा कुठेच सापडला नाही तेव्हा बालकाच्या आईवडिलांनी जीआरपी पोलीस ठाण्यात बाळा चोरी गेल्याची तक्रार केली. पोलीस ठाण्यात बाळाचा चोरी झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही  संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. 
 
या व्हिडीओ मध्ये दिसत आहे की अंधार असल्यामुळे हे कुटुंब प्लॅटफॉर्मवर झोपले आहे. हा अज्ञात व्यक्ती झोपलेल्या त्या कुटुंबाजवळ जातो आणि इथे तिथे संधी साधून  बाळाला घेऊन पळ काढतो.पोलीस या व्यक्तीचा शोध घेत आहे. लवकरच त्याचा शोध लावला जाईल असं पोलिसांनी सांगितलं.