शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 1 सप्टेंबर 2022 (14:51 IST)

काय हे, गणेशोत्सवात गणपती मंदिराचा सोन्याचा कळस गेला चोरीला

hipprga temple
ऐन गणेशोत्सवाच्या मध्यरात्री सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील हिप्परगा गावातील गणपती मंदिराचा  सोन्याचा कळस चोरीला गेला आहे. मश्रूम गणपती मंदिराचा 24 तोळे वजनाचा सोन्याचा कळस चोरीला गेला आहे.
 
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांनी या गणपतीची स्थापना केल्याचा इतिहास आहे. यापूर्वीही 2016 मध्ये देखील या मंदिराचा कळस चोरीला गेला होता. सोन्याचा कळस दुसऱ्यांदा चोरीला गेल्याने नागरिक संतप्त झालेत. सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या अष्टविनायक गणपतींपैकी सातवा गणपती म्हणून ओळखला जातो. तळे हिप्परगा येथील मशरुम गणेशाच्या सुवर्ण कळसाने बुधवारी पहाटे खळबळ उडवून दिली. सहा वर्षांनंतर चोरट्याने दुसऱ्यांदा हा प्रकार केला आहे.
 
शहराजवळील हिप्परगा तलावातील मशरूम हे गणपती शहराचे भूषण मानले जाते. मंगळवारी रात्री नियमित पूजा आटोपून पुजाऱ्यांनी मंदिर बंद केले. पुजारी संजय पतंगे हे नेहमीच्या पूजेसाठी पहाटे चारच्या सुमारास उठले. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी प्रथम कलशाचे दर्शन घेणे ही त्यांची नेहमीची सवय होती. दर्शन घेण्यासाठी पाहिले असता कलश दिसला नाही. तो चोरीला गेल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने ही कल्पना भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हौशेट्टी यांना सांगितली. त्यानंतर सोलापूर तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्यात आला.  यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.